‘अस्वस्थ नोंदी’ : ही माळ आहे, माणुसकीवर श्रद्धा असलेल्या माणसाने जपली पाहिजे अशी, सलग वाचावी अशी आणि पुन्हा पुन्हा वाचावी अशी
अस्वस्थ नोंदी वाचताना गिरीश अवघडे यांच्या निरीक्षणशक्तीची कमाल वाटत राहते. खुपदा आपण जी गोष्ट टिपण्याचा विचारही करत नाही, अशा गोष्टी हा माणूस मांडत असतो. त्यांच्या नोंदी अस्वस्थ करतात. विचार करायला लावतात. ‘आत्मदहन’, ‘दिल्लीची छाया’ या काही अतिशय साधेपणाने लिहिलेल्या नोंदी हादरवून टाकतात. बातमी लिहिणारा पत्रकार माणूस असा अजिबात मसाला न टाकता लिहितो, हे कमालीचं आवडून जातं.......